- शेतकऱ्याच्या डोक्यावर आभाळचं कोसळलं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- मावळातील पवनमावळ परिसरातील काले-पवनानगर येथील विठ्ठल उर्फ बापु गणपत जगताप यांचे जोरदार पाऊसामुळे व वाऱ्यामुळे घर कोसळून पिंट्या व बबड्या या दोन बैलाचां आज पहाटे साडेपाचच्या सुमारास मृत्यु झाला आहे.
कुटुंबाची ७ एकर शेती असुन त्यांनी ६ महिन्यापुर्वी शेतीची कामे करण्यासाठी दिड लाखाला ही बैल जोडी आणली होती. बैलांना चारा घालण्यासाठी शेतावर असलेल्या घरावर गेले असता त्यांना बैलांच्या अंगावर घर कोसळलेले दिसले. बैलांच्या अंगवार विटा, दगड, पत्रे पडुन बैल ढिगाऱ्याखाली मृत पडल्याचे त्यांनी पाहिले आणी त्यांना अश्रु अनावर झाले.