- चिखलीत ४२ सदनिकांना टाळे; घुसखोरांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :-पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे घरकुल प्रकल्प राबविले जात आहे. त्या प्रकल्पातील वाटप न झालेल्या डी – १२ या इमारतीमध्ये काही नागरिकांनी घसखोरी केली होती. ही बाब पालिकेस समजताच त्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकूण ४२ सदनिका बुधवारी (दि. २८) ताब्यात घेतल्या.
पालिकेकडून इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पात्र लाभार्थ्यांना लॉटरीच्या माध्यमातून वितरण केले जाते. प्रकल्पातील डी-१२ या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तेथील ४२ सदनिकांमध्ये काही नागरिकांनी घुसखोरी केली होती. ही बाब पालिकेस समजाच त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. घुसखोरी केलेल्या नागरिकांना सदनिका रिकाम्या करण्यास ताकीद देण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तात स्थापत्य विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. घुसखोरांना हाकलून लावत एकूण ४२ सदनिकांना टाळे लावण्यात आले.
या संदर्भात कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी सांगितले, की घरकुलात तयार होत असलेल्या एका इमारतीमध्ये काही नागरिकांनी घुसखोरी केल्याचे निर्देशनास आले होते. ड्रेनेज, पाणी व विद्युतपुरवठा आदी कामे झालेली नसताना ते राहत होते. पोलिसांत गुन्हा नोंदविल्यानंतर अनेक जण रात्रीच पळून गेले. कारवाई करीत सदनिकांना टाळे लावण्यात आले आहे.















