- मासुळकर कॉलनीत चालवीत होती कुंटणखान..
- आईसह चौघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :- आपल्या पहिल्या पतीपासून झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस वेश्या व्यवसास लावले. तसेच अन्य दोन महिलांकडूनही वेश्या व्यवसाय करून घेतला. माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. अल्पवयीन मुलीसमोर तीन ग्राहक अश्लील चाळे करीत होते.
मंगळवारी (दि. २७) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पोलिसांनी घराची झडती घेतली असता महिला आरोपीच्या घरात ४७६ ग्रॅम गांजा आणि विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी गांजा आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या. मासुळकर कॉलनी, पिंपरी मधील एका सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर हा प्रकार सुरू होता.
अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले यांनी बुधवारी (दि. २८) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिला आरोपी (वय ३२) आणि अजय नारायण माने (वय २२, रा. दोघेही रा. श्रेयस हाईटस्, उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, पिंपरी), ओंकार बाळासाहेब कदम (वय २२, रा. करावागज, ता. बारामती, जि. पुणे), राकेश रामजीलाल चौधरी ऊर्फ सहारान (वय ३२, रा. ट्रान्सपोर्ट नगर, निगडी), मांगीलाल सुरतसिंग बुगालिया (वय ३२, रा. प्राधिकरण पेठ क्रमांक २३, निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक नाईकवाडे तपास करीत आहेत.















