न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जाने.) :- पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील निगडी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस विभागास वर्षभर मदत करणारे पोलीस मित्र-विशेष पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे संस्था, संघटना, उद्योजक, शिक्षण तज्ञ ,स्वीट सप्लायर, पत्रकार, छायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती सहायक पोलिस आयुक्त राम जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र निकाळजे, सहायक पोलिस निरीक्षक एल एन सोनवणे यांची होती.
सन २०१८ मध्ये पोलीस यंत्रणेला मदत करणाऱ्या संस्था प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, जेष्ठ नागरिक संघ, पोलीस नागरिक मित्र, समिती अध्यक्ष विजय पाटील, सूर्यकांत मुथीयांन, विजय शिनकर, महिला अध्यक्ष अर्चना घाळी, संपर्क प्रमुख विजय मुनोत, विभाग प्रमुख बाबासाहेब घाळी, अमित डांगे, अमोल कानु, बळीराम शेवते, विजय जगताप, शंकर अडसूळ, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, उद्धव कुंभार, विजय बर्गे, अविनाश ठोंबरे, अशोक तनपुरे, संतोष चव्हाण, शोभा देशपांडे, संजय लोखंडे, दत्तात्रय देवकर, राजेश हजारे, संजय कांबळे, भरत उपाध्ये यांचा सन्मान सहा. आयुक्त राम जाधव यांनी केला. पोलीस मित्रांच्या वतीने विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जेष्ठ नागरिकांच्या वतीने सूर्यकांत मुथीयांन यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना अमरनाथ वाघमोडे म्हणाले, “गणेशोत्सव असू की, पालखी सोहळा पोलीस मित्र खांद्याला खांदा लावून पोलीस विभागास सहकार्य करत असतात. स्वयंप्रेरणेने व निस्वार्थी भावनेने अनेक उद्योजक, संस्था संघटना पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देत असतात. त्याच्या कामाची दखल घेऊनच निगडी पोलिसांच्या वतीने सदरचा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.”
कृतज्ञता सन्मान स्वीकारल्यानंतर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करण्याचे कार्य समिती गेले १८ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात करीत आहे. “जागते रहो – रात्रगस्त” उपक्रम असो की पालखी सोहळा समितीचे पोलीस मित्र स्वयंप्रेरणेने पोलिसांना मदत करत असतात. आयुक्तालयाने आज केलेला सन्मान पोलीस मित्रांना काम करण्यासाठी स्फूर्ती व प्रेरणा देईल यात शंका नाही.”
सूत्रसंचालन निरीक्षक एल एन सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन हवालदार स्वामीनाथ जाधव यांनी केले.















