न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जाने.) :- पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथे शनिवार (दि. ५) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पायलींग मशिन उलटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. याची तज्ञ समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त व महामेट्रो प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत सुरु असणा-या महामेट्रोच्या कामाचे तज्ञ समिती किंवा त्रयस्त संस्थेमार्फत सेफ्टी ऑडीट आणि स्ट्रक्चरल ऑडीट करावे. त्याचा अहवाल सर्व नागरिकांसाठी वृत्तपत्रांतून प्रसिध्द करावा. शनिवारी झालेल्या अपघातास जबाबदार असणा-या अधिका-यांवर, ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक क्राँग्रेस शहर अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, नगरसेवक राजु बनसोडे, ऋषिकेश वाघेरे पाटील, कुणाल थोपटे, प्रतिक साळुखे, सचिन मोकाशी, आलोक गायकवाड, भागवत जवळकर, महेश किवळे, प्रशांत सपकाळ, विशाल पवार, धनंजय जगताप, धनाजी ताबे, सचिन मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जोपर्यंत सेफ्टी ऑडीट आणि स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल जाहिर होत नाही, तोपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील महामेट्रोचे पुर्ण काम थांबवावे, अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सुरक्षितते संबंधात उपाय योजना कराव्यात. नागरिकांच्या जिवीत व मालमत्तेचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी अन्यथा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वाकडकर यांनी प्रशासनास दिला आहे.















