- श्री महेशदादा लांडगे युवा मंच व हिंद स्वराज मित्र मंडळाचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२१) :- चिखलीत आमदार श्री महेशदादा लांडगे युवा मंच व हिंद स्वराज मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. अण्णाभाऊंच्या आठवणीना उजाळा देण्यात आला. यावेळी दिनेश यादव, सोमनाथ लोंढे, किशोर लोंढे, दिपक घन, बाळा लोंढे, तेजस लोंढे, मनोज लोंढे, सोनु लोंढे, शाम थोरात, वैभव तापकीर आदी उपस्थित होते.