- आमदार महेशदादा लांडगे यांच्या आवाहनाला साद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२१) :- श्री राजेशभाऊ सस्ते युवा मंच मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ मोशी यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्या आवाहनाला साद देत कोकणवासीयांना मदत केली.
तब्बल २ टन गहू, तांदुळ व जीवनावश्यक गरजेच्या वस्तू त्यामध्ये ४०० किलो आटा, कपडे, साबण, तेल, लोणचे, ब्रश, ज्वारी, बाजरी, कडधान्य, बिस्किटे, साड्या, पिण्याचे पाणी, आरोग्यासाठी १५०० टॅबलेट इत्यादी साहित्य पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश दत्तात्रय सस्ते आणि जय मल्हार सुवर्ण संचयच्या अध्यक्षा अर्चना राजेश सस्ते यांनी केले. यावेळी बांधकाम व्यवसायिक दत्तात्रय मोकाशी, संभाजी बोऱ्हाडे, अनंता आल्हाट, बाळासाहेब सस्ते, प्रभाकर बोराटे, विठ्ठल कामठे, दीपक सस्ते, पांडुरंग सस्ते, सीताराम कुटे, राजकुमार सस्ते, संजय सस्ते, राजू ओझरकर, हिरामण सस्ते, रामभाऊ सासवडे आदी उपस्थित होते.












