- ॲम्बुलन्ससह जीवनावश्यक वस्तूंचे कीट कोकणच्या दिशेने रवाना…
- काळेवाडी-रहाटणीतील कोकणवासीय आप्तांच्या दुःखात मीही सहभागी – सोमनाथ तापकीर….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२१) :- कोकणातील दुर्घटनेमुळे तेथील बाधीतांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची व आरोग्याच्या दृष्टीने ॲम्बुलन्सची गरज निर्माण झाली होती. ही निकड ओळखून काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांनी पुढाकार घेत, तातडीने मदतकार्य सुरु केले. अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची मदत गोळा केली. ओम साई ॲम्बुलन्स सर्व्हिस संघटनेने पाच ॲम्बुलन्स सुसज्ज केल्या. हे मदतकार्य आज गुरुवारी (दि. ०५) रोजी कोकणातील महाड व चिपळूणच्या दिशेने रवाना करण्यात आले.
या मदतकार्यात ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ तापकीर, सचिव रुपेश तापकीर, ओम साई ॲम्बुलन्स सर्व्हिस संघटनेचे अक्षय चिंमले, राकेश चंदनशिव, नरेश जोशी, चिराग मित्तल, कृष्णा सूर्यवंशी, मयूर सुर्यवंशी, चेतन कवटे, बबलू शेख, अजित धारूरकर, भरत जोशी, प्रशांत कदम, मोहन चव्हाण, अजीम पठाण, सुजित गांगुर्डे, तस्लिम अन्सारी, संदीप सिंग, अनिल नाथानी, नितीन गीते, सूरज पवार, निलेश पवार, प्रवीण झांजे, किरण लोंढे, कय्युम शेख, डॉ. मनोहर शिंदे, सिध्देश्वर फसले, गोपाल म्हैसमाळे, महादेव जोगदंड, अनिकेत बाबर, स्वप्नील अहीवळे आदींनी सहभाग घेतला.
सोमनाथ तापकीर म्हणाले, कोरोनाच्या संकटातून सावरत नाही, तोपर्यंत राज्यात विशेषतः कोकण विभागात पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसला. महाडसह चिपळूणमधील अनेक भागमध्ये जलप्रलय तर घरांवर दरड कोसळल्यानं अनेक जण बेपत्ता झाली. कोकणातील आपल्या आप्त व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसल्यामुळे काळेवाडी-रहाटणीतील कोकणवासीय व परिसरातील नागरिक उद्विग्न अवस्थेत होते. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातून मदतकार्याचे आवाहन केले. पूरग्रस्तांची खरी गरज पाहून स्व-खर्चातून व प्रभागातील दानशूर व्यक्तींच्या लोकवर्गणीतून जीवनावश्यक वस्तू, मेडिकल व इतर उपयोगी वस्तू प्राप्त झाल्या. त्याचे कीट तयार केले. ओम साई ॲम्बुलन्स सर्व्हिस संघटनेने पाच ॲम्बुलन्स दिमतीला देऊन आरोग्य व्यवस्थेवरील काहीसा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. हे मदतकार्य घेऊन स्वतः कोकणातील चिपळूणच्या दिशेने कूच केली. उद्या ही मदत कोकणातील दुर्घटनास्थळी दाखल होणार असल्याचे तापकीर म्हणाले.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी बाह्य सरसावल्याने सोमनाथ तापकीर यांचे सर्वच स्तरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.












