- अधिकृत लसीकरण केद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षापुढील लाभार्थींना शनिवारी (दि. ०७) रोजी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर देण्यात येईल. यासाठी पहिला व दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता ३०० असणार आहे. त्यापैकी २१० लाभार्थ्यांना कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी व स्लॉट बुकिंगची अट असून उर्वरित ९० लाभार्थ्यांना मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे टोकन घेणे क्रमप्राप्त असून एस.एम.एस. संदेश ग्राह्य धरला जाईल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ, प्रेमलोक पार्क दवाखाना या केंद्रांवर एकूण ३०० क्षमते इतके लसीकरण केले जाईल. त्यापैकी २७० लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे केले जाईल. उर्वरित ३० लाभार्थ्यांना मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे टोकन घेणे क्रमप्राप्त असून एस.एम.एस. संदेश ग्राह्य धरला जाईल.
तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार, दि.०७/०८/२०२१ रोजी नवीन जिजामाता रुग्णालय लसीकरण केंद्रावर कोविड-१९ लसीचा पहिला डोस १०० व दुसरा डोस १०० क्षमतेने पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी १०.०० ते सायं ०५.०० या वेळेत करण्यात येणार आहे.
अटी :-
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल.
कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी दि. ०७/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट,बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
“कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसासाठा उपलब्ध नसल्याने दि.०७/०८/२०२१ रोजीया लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.