- रहाटणीतील सुमारे ५०० नागरिकांनी घेतला उपक्रमाचा लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२१) :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणी येथे मोफत पीयूसी तपासणी व छत्री वाटप हा उपक्रम पार पडला.
माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे मा नगरसेवक कैलासभाऊ थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना पीयूसी व छत्री वाटप करण्यात आले. याप्रसंगी दादा कट्टे पाटील,विकास थोपटे, प्रदीप चौधरी, संतोष परसे, नंदू पाटील, सुरेश शिंदे, माणिक थोरात, प्रकाश चौधरी, रामदास गोडांबे, महेश थोरात, विशाल नाचपल्ले, हनुमंत कुरुळे, विशाल काळे, गौरव शितोळे, चैतन्य थोरात, प्रमोद कुंजीर, लहू आवळे, प्रशांत शिंदे, संतोष ओव्हाळ, आकाश आचारी, पंकज शिंदे, स्वप्नील सस्ते, गणेश वाबळे, दिनेश देशमुख, प्रणव नखाते, किरण पाडुळे, पृथ्वी रणदिवे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवा नेते कुणाल थोपटे म्हणाले की, अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही. तसेच मागील काही दिवसांत मुसळधार पावसामुळे राज्यावर जे आस्मानी संकट कोसळलेले आहे त्यामुळे राज्यात दुःखाचे सावट आहे. अशा वातावरणात वाढदिवसाचा जल्लोष करणे योग्य नाही. तसेच देशातील जेष्ठ नेते शरदचंद्र पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमचा सातत्याने समाजकारण करण्याकडे जास्त कल असतो.
दरम्यान, यावेळी रहाटणीतील सुमारे ५०० नागरिकांनी छत्री वाटपाचा तर २०० वाहनचालकांनी आपल्या वाहनांची मोफत पीयूसी तपासणी करून या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.












