- लॉज मालकासह चौघांना अटक; रोख रक्कम, जुगाराचे साहित्य जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- आर्थिक फायद्यासाठी ऐश्वर्या लॉजमध्ये जुगाराचा अड्डा चालवला. त्यामध्ये आरोपी तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.
लॉज मालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई थरमॅक्स चौकातील ऐश्वर्या लॉज येथे सोमवारी (दि. २) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली. पोलीस कर्मचारी कंठय्या गुरय्या स्वामी यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अशोक तुकाराम आखाडे (वय ४५, रा. संभाजीनगर, चिंचवड), विजय बापूराव गोलाईत (वय ४६ रा. घरकुल, चिखली), संजय विक्रम सपकाळ (वय ३८, रा. चिखली), अंबादास सखाराम वाघ (रा. मोरे वस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.