- शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात छोटी-मोठी हजारो गणेशोत्सव मंडळे महानगरपालिकेच्या मैदानात, रस्त्यावर व इतरञ ठिकाणी परवानगी घेऊन मंडपाचे भाडे भरून उत्सव साजरा करतात.
यंदा कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे परवानगी शुल्क, मनपा जागेचे भाडे माफ करावे व मंडळांना उत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख प्रविण धोंडाप्पा पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. मंडळाचे कार्यकर्ते, पोलिस यांच्याशी एकञित चर्चा करून समन्वयाने यावर निर्णय घेण्यात यावा, असेही कळविले आहे.