- कुटुंबाचेही मिळू शकते प्रमाणपत्र; करा या तीन पद्धतीचा अवलंब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२१) :- कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र आता काही मिनिटांत तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवू शकता. यासाठी तीन सोप्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यापूर्वी कोविन संकेतस्थळावर जाऊन लस घेतल्याचे प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागत होते.
अशी आहे प्रक्रिया :-
सर्वप्रथम, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर +९१९०१३१५१५१५ हा नंबर सेव्ह करावा लागेल. (हा नंबर तुम्ही लस घेताना प्रविष्ट केलेल्या त्याच मोबाईल नंबरवर सेव्ह करावा लागेल) हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप उघडा. चॅट बॉक्सवर जा आणि कोविड प्रमाणपत्र covid cirtificate असे टाइप करा. हे टाइप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी मिळेल. हा ओटीपी व्हॉट्सअॅप चॅट बॉक्समध्येच टाईप करा आणि पाठवा.
तुम्हाला मिळणारा ओटीपी फक्त ३० सेकंदांसाठी असेल. जर तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या लसीकरणाच्या वेळी समान नंबर दिला असल्यास ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला सर्व सदस्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. हे प्रमाणपत्र तुम्ही डाउनलोड करून जतन करून ठेवू शकता.


















