- तरुणाची बिजलीनगरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२१) :- विनापरवाना लोखंडी कोयता बाळगून ‘आला रे आला सगळ्यांचा बाप योगेश आला, मला जो नडला त्याला उभ्याने तोडला’, असे मोठ्याने ओरडत आरोपीने कोयता हवेत फिरवला.
लोकांना धमकी देत बिजलीनगर हनुमान स्वीटच्या दिशेने तो जात होता. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. पोलीस कर्मचारी निवास धनंजय विधाटे यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
योगेश अनंता गायकवाड (वय २५, रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. १०) सायंकाळी ही कारवाई केली.
















