- पतीकडून तरुणाचा खून; पत्नीला लोखंडी स्टूलने मारहाण; पतीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२१) :- आरोपीची पत्नी आणि एकजण हे काही वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत होते. सर्वांची चांगली ओळख होती, परंतु, पत्नीचं आणि तरुणाच काहीतरी सुरू आहे असा संशय पतीला आला होता.
दरम्यान, त्यांचे अनैतिक संबंध असल्याचा विचार नेहमी त्याच्या मनात यायचा. दोघांना अनेक वेळा बोलताना पतीने पकडले होते. यामुळे संतापलेल्या पतीने कंपनीतच दोघांना मारण्याचं ठरवलं. त्यानुसार सर्वजण कामावर असताना पत्नीसमोरच पतीने थेट तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याच्या डोक्यात घाव घालण्यात आल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. तसेच, पत्नीला देखील लोखंडी स्टूलने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी आहे, अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली. या प्रकरणी रामेश्वर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून अमोल असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी केली आहे.












