- पीडित चार महिलांची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२१) :- पिंपळे सौदागर येथील मंत्रा स्पा सेंटर येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी सोमवारी (दि. ९) सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला.
आरोपींनी पैशांचे आमिष दाखवून चार महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. १०) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
युवराज लहूराज शिंदे (वय २४), प्रकाश बापू पुरुंद (वय २६, दोन्ही रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित चार महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.












