- आगामी पालिका निवडणुकीत पदवीधर उमेदवारांना देणार तिकीट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत किमान पाच पदवीधर उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पदवीधर संघातील सदस्यांचे काम आहे. ते त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी त्यांना तिकीट दिले जाणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी (दि.११) पत्रकार परिषदेत सांगितले.
पदवीधर महामंडळाच्या वतीने पश्चिम महारष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये संघटन बांधणीसाठी पदवीधर संघटनेचे आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वामध्ये दौरा करण्यात आला. त्याची सांगता पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आली, त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत वाघेरे बोलत होते. यावेळी पदवीधर महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील. पिंपरी चिंचवड पदवीधर संघटनेचे अध्यक्ष माधव पाटील आदी उपस्थित होते.
पदवीधर महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील म्हणाले, पक्षाच्या आदेशाने संघटन बांधणी आढावा घेण्यासाठी शहरात आलो आहे. चार वर्षांपासून पदवीधरांसाठी काम करत आहे. पदवीधर अर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे ही मागणी केली जात होती. आमदार अरूण लाड यांच्या नेतृत्वामध्ये काम सुरू आहे. शिक्षणाच्या बाबतीत पदवीधरांना अर्थिक मदत केली जात आहे.