- पिं. चिं. पत्रकार कक्षातील संगणक व टीव्हीचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्षात दूरचित्रवाणी (टी.व्ही.), संगणक तसेच प्रिंटर बसवण्यात आला आहे. याचे उद्घाटन गुरुवारी (दि. १२) महापौर माई ढोरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी महापौर ढोरे म्हणाल्या की, पत्रकार हा शहरातील वेगवेगळ्या बातम्या गोळा करत असतो. त्या बातम्या वर्तमानपत्र व सोशल मीडिया या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो. शहरातील राहिलेल्या कामाची आठवण राजकारण्यांना करून देत असतो. त्यामुळे ते काम केल्यानंतर राजकारण्यांनाही समाधान वाटते. मुलाखती घेणे, बातम्या देणे यातून तो मोठा होत असतो. शब्दांकन व भाषा याचा अभ्यास दूरचित्रवाणी (टी.व्ही.) वर चालणाऱ्या बातम्यांच्या प्रसार करणाऱ्या वाहिन्यातून होणार आहे. शहरातील प्रत्येक पत्रकार आपल्या क्षेत्रामध्ये मोठा व्हावा अशा अपेक्षा व्यक्त करून त्यांनी पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनीही पत्रकार कक्षाला भेट दिली. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, माजी. नगरसेवक मारुती भापकर, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, ज्येष्ठ पत्रकार विनोद पवार, न्यूज पीसीएमसीचे प्रतिनिधी संतोष जराड, सुनिल कांबळे, प्रवीण शिर्के, मिलींद कांबळे, तुळशीदास शिंदे, अमोल काकडे, अजय कुलकर्णी, मंदा बनसोडे, माधुरी कोराड, दादा आढाव, दिपक साबळे, सुरज साळवे, जितेंद्र गवळी, गणेश मोरे आदी उपस्थित होते.