- घर किंवा कार्यालय सुरक्षित ठेवा; महावितरणचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- सध्या सर्वत्रच पावसाळा सूर आहे. घर, दुकान, सोसायट्या तसेच इतर वास्तूमधील अंतर्गत वायरिंग, विविध उपकरणे किंवा लोखंडी साहित्यामधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून प्राणांतिक अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांकडील अंतर्गत वायरिंगमधील करंट लिकेज किंवा योग्य क्षमतेचे सर्कीट बेकर, अर्थिग नसणे कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वास्तूंमध्ये सीट डएलसीबी, आरसीसीबी, एमसीबी लावण्यात यावे असे, आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
तीन महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिझर कुकर, पाण्याचा नळ, कृषिपंप पाण्याची मोटार किंवा विविध उपकरणांमुळे विजेचा धक्का बसून प्राणांतिक अपघात झाले आहेत. यामध्ये दोन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. वायरिंग जुनाट होणे व वायरिंगचे इन्सुलेशन निघणे किंवा उंदराने कुरतडल्याने लाईव्ह वायरपासून विद्युत अपघाताचा धोका निर्माण होणे, यामुळे अपघातांसाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. योग्य अर्थिंग व सर्कीट ब्रेकर बसविण्याकडे दुर्लक्ष केल्याने सुशिक्षित घरांमध्येही विद्युत अपघात झाले आहेत.
घरगुती किंवा इतर आस्थापनांमधील अंतर्गत वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास आणि वीजपुरवठा खंडित न होता सुरु राहिल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असते. वीजपुरवठा तत्काळ खंडित होणे आवश्यक आहे. यासाठी घर, सोसायट्या किंवा इतर वास्तुमध्ये सीट बेकर जसे की अर्थ लिकेज सीट बेकर (डएलसीबी), रेसीड्यूअल करंट सीट बेकर (आरसीसीबी) मिनिएच्यूअर सर्किट ब्रेकर (एमसीबी) लावणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणामधील दोषामुळे सर्किट बेकर म्हणजे विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्वाचे सुरक्षा कवच आहे. विविध उपकरणांचा क्षमतेपेक्षा अधिक वीज वाप, करंट लिंकेज होणे, शॉर्टसर्किट होणे, व्होल्टेज वाढणे, अर्थ फॉल्ट होणे प्रकारांपासून होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्किट ब्रेकरकडून वीजप्रवाह खंडित केला जातो. हा सीट ब्रेकर दोन हजार ते तीन हजार रुपये किंमतीत मिळतो. ते घर, कार्यालय आदी ठिकाणी लावून घेणे गरजेचे आहे, असे महावितरणने सागितले.