- महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर व हेल्थ कार्डचे मोफत वाटप..
- काळेवाडीतील मच्छिंद्रतात्या तापकीर सोशल फाउंडेशनचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- काळेवाडी येथील मच्छिंद्र तात्या तापकीर सोशल फाउंडेशनच्या वतीने खास महिलांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संतोष कोकणे, नगरसेविका उषा काळे, चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदीप चिंचवडे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, माजी नगरसेविका अनिता तापकीर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप काळे, शिवाजी तेलंगे, प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, राजाराम शेळके, अंकुश भोकरे, हर्षल परमार, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर बी. व्ही. प्रियांका, डॉ अतुल डायामा, डॉ राजेंद्र साठे, डॉ दीपक भाले, सामाजिक कार्यकर्त्या गोदाबाई चोरमले, शोभा वानखेडे, मंदा जाधव यांच्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मच्छिंद्र तापकीर म्हणाले, मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाने नागरिक हैराण झाले आहेत. एकामागून एक संकटाचा सामना करावा लागत आहे. धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष् देण्यास महिलांना वेळच मिळत नाही, त्यामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिला निरोगी राहिल्या तर संपूर्ण कुटुंबच आरोग्यदायी राहते. यासाठी महिलांच्या आरोग्याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे, ही काळाची गरज आहे.
या प्रसंगी महिलांचे अंधत्व निवारण, अनियमित मासिक पाळी व श्वेत प्रदर उपचार, प्रस्तुती पूर्व पश्चात घ्यावयाची काळजी व मार्गदर्शन, गर्भसंस्कार व लसीकरण, महिलांचे व मुलीचे इतर सर्व प्रकारचे आजार यावेळी तपासण्यात आले. तसेच महिलांना हेल्थ कार्ड मोफत देण्यात आले.
नवनाथ देवकर यांनी सूत्रसंचालन केले तर, युवानेते सागर तापकीर यांनी आभार मानले.