न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२१) :- काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, कै.श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालय व श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एलबीटी इंग्लिश मीडियम स्कुल यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजपुजन संस्थेचे संचालक शिवाजी तेलंगे व सामाजिक कार्यकर्ते राजाराम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तिन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत वाखारे , नवनाथ गारगोटे , रेणू वर्मा यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पंकज देव यांनी तर आभार सौदागर केमदारणे यांनी मानले.