न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेला निगडी येथील उड्डाणपुल उद्घाटनाशिवाय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे हा पूल उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी बंद करण्यात आला होता.
ही कामे पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि २८) या पुलाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते व पालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. त्यासाठी पुलाला हार बांधण्यात आले होते; तसेच रोषणाईसाठी लाइटच्या माळाही सोडण्यात आल्या होत्या. मात्र, अचानकपणे झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे पदाधिकारी उद्घाटनास्थळी फिरकलेच नाहीत. त्यामुळे उद्घाटनाविनाच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.