- …प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पोलीस मित्र शाखेचे पुण्यात उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२१) :- पुण्यातील कात्रजच्या मांगडेवाडी परिसरात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या महाराष्ट्र पोलीस मित्र विभागीय शाखेचे तसेच कोविड सुरक्षा अभियानाचे उदघाटन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आण्णासाहेब जाधव, कोथरूड विभाग प्रमुख नाना कुंबरे, महिला अध्यक्षा अर्चना दाभोळकर, संपर्क प्रमुख विजय मुनोत, विभागीय अध्यक्ष विशाल माने, समिती राज्य अध्यक्ष विजय पाटील, विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, तेजस सापरिया, बाबासाहेब घाळी, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
देव म्हणाले,” पुणे शहराची गेल्या वर्षात कोविड विषाणू संक्रमनामुळे मोठी आरोग्य हानी झालेली आहे. शहराची आरोग्य व्यवस्था मूळ पदावर आणण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे संयुक्तरित्या प्रत्येक उपनगरात अश्या प्रकारे “कोविड सुरक्षा अभियान” राबविणे आवश्यक आहे.जनजागृती, प्रबोधन, लसीकरण यामुळे कोविडवर मात करणे शक्य होईल. कोरोना काळात पोलीस मित्रांचे सहकार्य पोलीस विभागास होत असते. गुन्हेगारी आलेख कमी करण्यासाठी समितीचे पोलीस मित्र नक्कीच सदैव स्थानिक पोलीस ठाण्यास सहकार्य करतील. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्रांची ही टीम विभागात यापुढे कार्यरत असेल”.
महिला अध्यक्षा अर्चना घाळी म्हणाल्या, ” महिलांच्या सुरक्षा व सक्षमीकरणासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती राज्यामध्ये गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहे. समितीच्या महिला पोलीस मित्र ह्या महिलांना तातडीने पोलीस मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्नरत राहतात. कोविड काळात पोलीस बांधवाना जो अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला आहे तो कमी करण्यासाठी समितीचे स्वयंसेवक सहकार्य करत आहेत.
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ” कात्रज परिसर व भारती विद्यापीठ परिसर वेगाने शहरीकरणाची कात टाकत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक सुरक्षाविषयीच्या समस्याही डोके वर काढत आहेत. त्याचप्रमाणे कोविड विषाणू संक्रमणही अजून सुरूच आहे. त्याकरिता पोलिस प्रशासन व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या संयुक्त माध्यमातून “शहरात कोविड सुरक्षा अभियान २०२१ ” राबविण्यात येत आहे.
यावेळी गौरव देव यांच्या हस्ते पोलीस मित्रांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच कोविड सुरक्षा अभियानांतर्गत मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर आणि टेम्प्रेचर थर्मल गनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विशेष परिश्रम अमोल कानू, विनोद मौर्या, सचिन यादव, सागर मान, विनायक रामगुडे, मंगेश जाधव, दुर्गादास अंभोरे, नेल्सन वाडे, सीता माने, गुंजा मौर्या यांनी घेतले.
विभागीय अध्यक्ष विशाल माने यांनी प्रस्ताविक तर, सूत्रसंचालन कविता जाधव यांनी केले.
















