- काही नव्याने पोलिसांच्या नेमणुका तर काहींच्या बदल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत तर, पोलीस आयुक्तालयाला नव्याने २१ पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. इतर घटकातून बदली झालेले १८ सहायक निरीक्षक तसेच ३२ उपनिरीक्षक शहर पोलीस दलात नव्याने दाखल होणार आहेत. शहरातून एक सहायक निरीक्षक तर १३ उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
बदली कोणाची, कोठे नियुक्ती करायची? याबाबत समिती निर्णय घेते. सर्व निरीक्षक दाखल झाल्यानंतर समितीची त्याबाबत बैठक होईल. त्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात येईल. तोपर्यंत त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे (यापूर्वीच्या नियुक्तीचे ठिकाण) :-
रावसाहेब जाधव (पो. प्र. केंद्र, नानवीज), विजया करांदे (पुणे शहर), सत्यवान माने (नागपूर शहर), शंकर दामसे (पुणे शहर), मनोज खंडाळे (लोहमार्ग, पुणे), दिलीप शिंदे (पुणे शहर), मधुकर सावंत (औरंगाबाद शहर), दीपाली धाडगे (पुणे शहर), रामचंद्र घाडगे (नवी मुंबई), मच्छिद्र पडीत (पुणे शहर), वर्षाराणी पाटील (लाप्रवि), दीपक साळुके (पो. प्र. केंद्र, नानवीज), किशोर पाटील (पो. प्र. केंद्र, सोलापूर), नितीन लांडगे (गुअवि), रमेश पाटील (गुअवि), सुनील तांबे (पो. प्र. केंद, जालना), रुपाली बोबडे (पो. प्र. केंद्र, अकोला), राजेद्र बर्गे (गुअवि), रणजित सावंत (पो. प्र. केट, नानवीज), ज्ञानेश्वर काटकर (लोहमार्ग, मुंबई), चंद्रकांत भोसले (मीरा भाईदर).
पोलीस आयुक्तालयातून इतर ठिकाणी बदली झालेले निरीक्षक (कंसात बदलीचे ठिकाण) :-
रंगनाथ उडे (पो. प्र. केंद्र नानवीज), अमरनाथ वाघमोडे (पो. प्र. केद्र, नानवीज), अजय भोसले (नवी मुंबई), सुनील पिंजण (गुअवि), दिलीप भोसले (बृहन्मुंबर्ड), बाळासाहेब तांबे (बृहमुबई), किशोर म्हसवडे (लाप्रवि) सुधीर अस्पत (रावि), सुधाकर काटे (गुअवि)
















