- आकुर्डीत भाजप युवती व युवा मोर्चा पदाधिका-यांची बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२१) :- महिलांना न्याय मिळवून देण्याची तसेच महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ताकद भाजपच्या युवतींमध्ये आहे. पक्षाने दिलेल्या या ताकतीचा उपयोग करा. आपल्याकडे असलेल्या संघटन कौशल्याचा फायदा युवती, विद्यार्थिनी व महिलांना करून द्या. पक्षाने तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा युवती विभागाच्या प्रभारी चित्राताई वाघ यांनी आकुर्डीत केले.
पिंपरी चिंचवड शहर युवा मोर्चातील पदाधिकारी तसेच युवतींसोबत बैठक पार पडली. त्यावेळी त्या उपस्थितांना संबोधित करताना बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, भाजयुमो युवती विभाग प्रदेश सह संयोजिका वैशाली खाडये, भाजयुमो प्रदेश सदस्य अजित कुलथे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुषार हिंगे, सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक अमित गुप्ता, विद्यार्थी विभाग पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजदीप तापकीर, आरंभ सोशल फाऊंडेशन संचालिका सोनाली हिंगे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सोशल मीडिया सह संयोजिका पूजा आल्हाट, भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस तेजस्विनी कदम, दिनेश यादव, गणेश जवळकर, शिवराज लांडगे, आदित्य कुलकर्णी, अमित देशमुख, मुक्ता गोसावी, सोनम गोसावी, ज्योती खंदारे, प्रकाश चौधरी, सनी बारणे, सुमित घाटे, विक्रांत गंगावणे, प्रियांका शाह, सारिका माळी, प्रिया देशमुख, प्रथम सकपाळ, शुभांगी कसबे, आरती ओव्हाळ, सुखदेव खिल्लारी, दिपक घन आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना चित्राताई म्हणाल्या, युवतींनी समाजकार्यात व राजकारणात आवर्जुन सहभागी व्हावे. एकमेकांसोबत एकत्रितपणे काम करावे. आपल्या शहरातील युवती व महिला वर्गाशी निगडित समस्या समजुन घ्या. त्या समस्या योग्य व्यक्ती, प्रशासन यांच्यापर्यंत पोहोचवा व त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. पक्ष तुमच्या कामाची योग्य ती दखल घेईल.
भाजयुमो युवती विभाग प्रदेश सह संयोजिका वैशाली खाडये यांनी आभार मानले.


















