- ‘कोव्हॅक्सिन’चे केवळ ४०० डोसेस; KIOSK टोकनप्रणाली बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्ष व त्या पुढील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या लाभार्थींना हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रावर रविवारी (दि. २२) रोजी अ, ब, क, ड, ह, फ या प्रभागवार पद्धतीने ३२९० डोस देण्यात येणार आहेत.
वय वर्षे १८ ते ४४ वयोगटासाठी पहिला डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थीना पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दुसरा डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
वय वर्षे ४५ पुढील वयोगटातील पहिल्या डोससाठी १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे तर, दुसऱ्या डोससाठी १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल. वरील दोन्ही गटांसाठी एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या नागरिकांनाच डोस देण्यात येणार आहे.
‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत महापालिकेच्या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर अ, ब, क, ड, ह, फ या प्रभागवार पद्धतीने ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनुसार नऊ हजार डोस देण्यात येणार आहेत.
‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ व ४५ वर्ष वयोगटापुढील पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर ८४ दिवस पुर्ण झालेल्या नागरिकांना पालिकेच्या लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपद्वारे अ, ब, क, ड, ह, फ या प्रभागवार पद्धतीने ८७०० डोसेस देण्यात येणार आहेत.
‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्ष व त्यावरील यांच्यासाठी फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्याना पालिकेच्या लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपद्वारे क, व फ या प्रभागवार पद्धतीने ४०० डोस देण्यात येणार आहेत.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. २२) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या (दि.२२) पालिकेच्या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.











