- आमदार लक्ष्मण जगताप यांना आणखी एक धक्का…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- भाजपा नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती माजी नगरसेवक राजू रामा लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २०) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याबाबतच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
दरम्यान २००२ ते २००७ मध्ये ते पिंपळे गुरवचे नगरसेवक होते. शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. वैदू समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्याचे ठोस आश्वासन अजित पवार यांनी दिले. त्यामुळे राजू लोखंडे यांनी पवार यांच्या उपस्थितीच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ते भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात.











