- महिलेने रॉकेल अंगावर ओतून घेऊन स्वतःला पेटविले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२१) :- मुलीच्या चारित्र्यावर पतीने लग्न झाल्यापासून संशय घेण्यास सुरुवात केली होती. तो दररोज दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असे. दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून अखेर पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. तिने स्टोव्हमधील घासलेट अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले.
ही घटना १ ऑगस्टला घडली. तर पत्नीचा उपचारादरम्यान १९ ऑगस्टला मृत्यू झाला. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
संतोष भीमराव गायकवाड (वय २६, रा, ओटास्किम, निगडी), असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २० वर्षीय विवाहितेच्या आईने याप्रकरणी शनिवारी (दि. २१) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.











