- थेरगावातील घटना; एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- थेरगावच्या कावेरीनगर पुलाजवळील सेवा रस्त्यावर वाहनाचा खोळंबा झाल्याने महिला व त्यांचे पती जात होते. त्यावेळी एकजण त्याच्या चारचाकी वाहनातून तेथे आला. गाडी काढा, असे तो हात करून म्हणाला.
महिलेने ‘थांबा’, असा हाताने इशारा केला. या कारणावरून आरोपीने महिलेला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या पतीला गाडीवरून ओढून खाली पाडले. त्यानंतर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. त्यानंतर पतीलाही धमकी दिली. सदर महिला यूट्यूब चॅनलवर शॉर्ट फिल्म बनवते.
रविवारी (दि. २२) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. महिलेने फिर्याद दिली. ऋषिकेश सावंत (वय ४०, रा. थेरगाव), असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे तपास करीत आहेत.
















