- इतर चौघांची कोठडी कायम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका भवनात छापा टाकून स्थायी समिती सभापतींसह स्वीय सहायक, लिपिक, शिपाई, संगणक चालक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती.
त्यांना आज सोमवारी न्यायालयात हजर केले असता, सभापती नितीन लांडगे यांची तात्पुरत्या जामीनवर मुक्तता झाली आहे. इतर चार कर्मचा-यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितीन लांडगे यांनी घरामध्ये कार्य असून त्याला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.











