- काळेवाडीतील घटना; आरोपी जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- पोलिसांप्रमाणे वेष परिधान करून स्वतः पोलीस असल्याचे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपी तोतया पोलिसाने फिर्यादी यांना वायसीएम हॉस्पिटल येथे नेले.
तिथे गेल्यानंतर आरोपीच्या स्टेटमेंटचा फोटो अर्जंट साहेबांना पाठवायचा असल्याची बतावणी करून आरोपीने फिर्यादी यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन घेतला. आरोपीने घेतलेला फोन फिर्यादी यांना परत न देता फसवणूक केली.
ही घटना २६ मार्च रोजी काळेवाडी आणि वायसीएम हॉस्पिटल येथे घडली. इरफान हाशम शेख (वय ४४, रा. चाकण) यांनी रविवारी (दि. २२) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन भाऊसाहेब सकाटे (वय ३७, रा. तानाजीनगर, चिंचवडगाव) असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.











