- पिंपरीतील घटना; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- महिलेचा नेहमी पाठलाग करून फिर्यादीच्या घरी जाऊन तिच्या घराचा दरवाजा वाजवला. त्या घराबाहेर आल्या असता आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.
तसेच शरीरसुखाची मागणी करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राहुल प्रकाश गायकवाड (वय २७, रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी), असे आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पालांडे तपास करीत आहेत.
















