न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून सोमवारी (दि. २३) रोजी उद्योजक तथा माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते काळेवाडी पोलीस चौकीस संगणक व प्रिंटर प्रदान करण्यात आला. काळेवाडीचे पोलीस चुकीचे API जाधव यांनी तो स्वीकारला.
यावेळी सांगवी- काळेवाडी मंडल अध्यक्ष,स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, ओ.बी.सी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराचे सरचिटणीस कैलास सानप, प्रभाग स्वीकृत सदस्य देविदास पाटील, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, ज्योती भारती, विमल काळे,जेष्ठ नागरिक धर्मा पवार, रमेश काळे, राहुल झारखंदे, विशाल वाळके, नंदा कापुरे, मंगेश कदम, ठाणे अंमलदार मारणे, मोमीन, राहुल बनकर, दक्षिण आघाडी प्रमुख अनिल शिरसाट, कार्तिक कुर्षणान, हनुमंत सुतार, दिलीप आंब्रे, सचिन पाटील, प्रकाश लोहार, सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.