- दिघीतील घटना; पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- एका अज्ञात व्यक्तीने महिलेला थांबवून काकू तुम्ही मला ओळखलं का? अस म्हटलं. अज्ञात आरोपीने त्यांची ओळख असल्याचं भासवल. तुमच्या गळ्यातील गंठन सारखे हुबेहूब गंठन बनवायचे आहे असे त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचा विश्वासात घेतले.
दरम्यान, गंठणाचा फोटो काढायचा आहे असे त्या व्यक्तीने सांगितले. मात्र गळ्यात असलेल्या गंठणाचा फोटो व्यवस्थित येत नसल्याचे सांगत तुम्ही गळ्यातील गंठन काढून हातात घ्या मग मी फोटो काढतो असे सांगत त्यांना गळ्यातील गंठण काढण्यास भाग पाडले. याचाच फायदा घेत हाताला हिसका मारून महिलेचे चार तोळे सोन्याचे गंठन घेऊन दोन अज्ञातांनी पळ काढला आहे.
विमल महादेव बांगर (वय ६५ वर्ष) असे फसवणूक झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे. विमल बांगर यांचा मुलगा दादासाहेब बांगर यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बांगड्या भरून घराकडे येत असताना दिघीत घडली असून पोलीस उपनिरीक्षक दळवी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.