- पिस्तूलातून तीन वेळेस हवेत फायर करत एकाचा काढला घाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- नानासाहेब गायकवाड याच्याकडून फिर्यादीने कर्ज घेतले होते. ते परत करण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले होते. मात्र, तक्रारदार हे वेळेत कर्ज परत करू शकले नाहीत. तसेच व्याजही वेळेत भरत नव्हते. त्यानंतर, गायकवाड याचा चालकाने तक्रारदार यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, टोळक्याने तक्रारदार यांच्या गॅरेजवर धुडगूस घातला होता, अशी माहिती पोलिसांत दिली आहे.
तेव्हा, देखील गायकवाड यांचा चालक अंकुश याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, रेंज रोव्हर या मोटारीतून गायकवाड यांच्या सुस येथील फार्म हाऊस नेवून तिथे फिर्यादीला पुन्हा धमकावण्यात आले आणि पिस्तूलातून तीन वेळेस हवेत फायर करत घाबरवले.
घटनेमुळे तक्रारदार घाबरून गेले होते. हा सर्व प्रकार जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या दरम्यानमधील असून सोमवारी सांगवी पोलीस ठाण्यात नानासाहेब शंकर गायकवाड, गणेश गायकवाड (मुलगा), राजाभाऊ अंकुश (चालक) यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.












