- शहरात आज १४४ जणांना बाधा; एकाचा मृत्यू तर, १२७ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २४) रोजी १४४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २६८४७७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २६३१०२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४३९० जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.












