- पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्यावर लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
हा प्रकार गुरुवारी (दि. २६) सायंकाळी रिव्हर रोड, पिंपरी येथे घडला. खंडू बबन शिरसाठ (वय ४३, रा. नढेनगर,काळेवाडी) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, त्यांचा चुलत भाऊ गणेश मदन शिरसाठ (वय ३६, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















