- दुसऱ्या डोसचा कालावधी संपून लस न घेतलेल्या लाभार्थ्यांना दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- वय १८ वर्ष व त्या पुढील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या लाभार्थींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रावर शनिवारी (दि. २८) रोजी अ, ब, क, ड, इ, ह, फ या प्रभागवार पद्धतीने ६९०० ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोसेस देण्यात येणार आहेत.
यातील पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे १२०० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे – ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ३०० डोसेस व उर्वरीत ५४०० डोसेस ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.
वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्याना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने २४०० ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे डोसेस देण्यात येणार आहेत.
यातील पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे १६० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे – ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ४० डोसेस व उर्वरीत २२०० डोसेस ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार, दि. २८/०८/२०२१ रोजी नवीन जिजामाता रुग्णालय या पालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोविड-१९ लसीचा पहिला १०० व दुसरा १०० डोसच्या क्षमतेने पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी १०.०० ते सायं ०५.०० या वेळेत देण्यात येणार आहे.
ज्या नागरिकांचा ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झाल्यानंतरही बाकी आहे त्यांनी पिं. चि. मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
स्तनदा व गरोदर महिलांच्या कोविड-१९ लसीकरणासाठी केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल. सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. २८) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.












