- कामगार, जेष्ठ नागरिक, महिलांचा उस्फुर्त सहभाग….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- चिखलीतील कुदळवाडी भागात स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने कामगार, जेष्ठ नागरिक, महिलांसाठी मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेचा शुभारंभ पालिकेच्या आकुर्डी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवी, डॉ राहुल साळुंखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. १८ वर्षांवरील तब्बल ३३० लाभार्थ्यांना पहिल्याच दिवशी कोविशिल्ड चा डोस देण्यात आला.
कुदळवाडीसह चिखली प्रभाग लसीकरणात शहरात आघाडीवर आहे. जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. परिसरातील लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड दाखवून मोठ्या संख्येने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे.












