न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खडकी (दि. ३० ऑगस्ट २०२१) :- अग्रवाल समाज खडकीच्या वतीने जन्माष्टमी आणि दहीहंडीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी सांगितले.
अग्रवाल समाज खडकीच्या वतीने जन्माष्टमी आणि दहीहंडीचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जन्माष्टमी निमित्ताने मनोरंजन इव्हेंटचे कार्यक्रमात राधाकृष्ण लहान मुलांची वेशभूषा, नृत्य, झाकी, नाट्य तसेच भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते.
मात्र, यंदाही कोरोनाचे सावट असताना प्रशासनाला संपूर्ण सहयोग करण्याच्या हेतूने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. याप्रसंगी ट्रस्टचे सुभाष अग्रवाल, राहुल अग्रवाल, मनीष गोयल, सुमित अग्रवाल आदि उपस्थित होते.












