- राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून बदलीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सा शिंदे यांची रायगड जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बदली करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या बोगस शिक्षक भरती प्रकरण, शालेय साहित्य वाटपातील अनियमितता या प्रकरणामूळे त्यांची कारकीर्द कायम वादग्रस्त ठरली होती. गेल्या महिन्यापासून त्यांची बदली करण्याबाबत प्रशासकीय हलचाली सुरू होत्या. वादग्रस्त असतानाही त्यांनी पाच वर्षाचा सेवाकाळ पूर्ण केल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
ज्योत्स्ना शिंदे ह्या महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी म्हणून २६ मे २०१८ मध्ये रुजू झाल्या होत्या. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ डिसेंबर २०१७ मध्ये शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी यांच्या बदलीच्या रिक्त झालेल्या जागेवर शिंदे त्यांची नियुक्ती केली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.












