न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ सप्टेंबर २०२१) :- एस बी पाटील ज्यू कॉलेज रावेत क्रीडा विभाग आयोजित क्रीडा दिन आणि मेजर ध्यानचंद यांची जयंती विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व शिक्षकांनी ऑफलाईन पद्धतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य संदीप पाटील तसेच न्यू इंग्लिश स्कूल रमणबागचे प्रा. महेश जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा महेश जोशी यांनी विविध खेळांची संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मेजर ध्यानचंद यांचा संपुर्ण इतिहास सांगितला. विविध खेळांची माहिती, करोना काळात सराव कसा करावा, निर्णय कसे घ्यावे अशा विविध गोष्टीवर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयात विविध खेळांची स्पर्धा राबवण्यात आली. यावेळी प्राध्यपकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सिहंगड वॉरियर्स या संघानी विजय मिळवला. तसेच या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पदमा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, सी.ई.ओ गिरीष देसाई यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्या दिल्या. तसेच क्रीडा विभाग प्रमुख प्रदीप कासार सर यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.
















