- गाढ झोपेतच डोक्यात हातोडा मारून केले पत्नीला गारद; भोसरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२१) :- पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. शनिवारी रात्री पत्नी झोपेत असताना पतीने तिच्या डोक्यात हातोड्याचा जोरदार प्रहार केला आणि चाकूने देखील वार केले असल्याचं समोर आलं आहे.
सरला साळवे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून विजयकुमार साळवे असे फरार आरोपी पतीचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे पती-पत्नी वास्तव्यास होते. विजयकुमार आणि सरला या दोघांचा दोन वर्षांपूवी प्रेम विवाह झालेला आहे.
दोघे ही भंडारा आणि गोंदिया येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ही घटना सोमवारी सकाळी समोर आली असून, एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.