- अज्ञात चोरट्यांचा सोनं आणि रोख रकमेवर डल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२१) :- अज्ञात चोरट्यांनी घराचे लॅच लॉक तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील लाकडी कपाटाच्या लॉकरमधून ४३ हजार रुपये किमतीची एक तोळे सोन्याची चेन, आणि साडेतीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना रविवारी (दि. ५) सकाळी साडेआठ ते सोमवारी (दि. ६) सकाळी आठ वाजताच्या कालावधीत ताथवडेतील जीवन नगर येथे घडली. निलेश शांताराम कुंभार (वय ३६, रा. जीवननगर, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (दि. ६) पहाटे सव्वादोन ते अडीच वाजताच्या सुमारास पुनावळेतील काटेवस्ती येथे ही घटना घडली. राहुल दिलीप काटे (वय ३७, रा. काटेवस्ती, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.












