न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२१) :- सात जणांनी एकाच्या बहिणीची छेड काढल्याचा राग मनात धरून १६ वर्षीय मुलाचा मिळून खून केल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सहा आरोपी फरार आहेत.
मुलाचे अपहरण करून चाकण मार्केट यार्ड येथील मोकळ्या जागेत आणले, तिथे त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत मुलीच्या भावाने लोखंडी रॉडने मारले. शिवाय, एकाने मुलाच्या डोक्यात दगड घातला. यात १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
रोहित प्रभू साहनी वय- १६ वर्षे अस खून झालेल्या मुलाचे नाव असून अराफत वाजीब शिकीलकर, युसूफ अर्षद काकर, करण पाबळे, हुजेब असिफ काकर, निहाल इनामदार, मन्सूर इनामदार, सोहेल इनामदार अशी आरोपींची नावे आहेत. इतर सहा फरार आरोपींचा चाकण पोलीस शोध घेत आहेत.












