- अकरा जणांवर गुन्हा दाखल; मुद्देमालही जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- निगडीतील ओटा स्कीममध्ये अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा जुगार खेळ सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली.
पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेपाच वाजता कारवाई करीत अकरा जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य चिठ्ठी, कार्बन, मोबाइल तसेच रोख रक्कम जप्त केली आहे. पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दगडू सुभाष जाधव (वय ५०, रा. वेताळनगर, चिंचवडगाव), परमेश्वर संभाजी कसाब (वय ४३, रि. टॉवर लाईन निगडी), रामदास लक्ष्मण लष्करे (वय ३७, रा. ओटास्कीम निगडी), राहुल राजू लष्करे (वय ३०, रा. ओटास्कीम निगडी), संतोष भोजू लष्करे (वय ३२, रा. ओटास्कीम निगडी), रमेश रंगनाथ देवकुळे (वय ४८, रा. पाटीलनगर, पुणे), गौतम बबन साळवे (वय ३२, रा. ओटास्कीम निगडी), चंद्रकांत शावराव शिंदे (वय ४०, रा. ओटास्कीम निगडी), किशोर कुमार मौर्या (वय ४२, रा. पाटीलनगर, चिखली), रफिक खान (वय ३५), सोनू खान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.