- दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- फिर्यादी त्यांच्या पत्नी आणि कामगार असे तिघेजण फिर्यादीच्या घराचे बांधकाम करत होते. गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी तिथे आला. त्याने बांधकाम करायचे नाही, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
फिर्यादी त्यांची पत्नी आणि कामगार असे च-होली पोलीस चौकी येथे तक्रार देण्यासाठी आले असता त्यांच्यामागे आरोपीदेखील आला. त्याने हातातील शहाबादी फरशीचा तुकडा कामगाराच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. ही घटना चांभारवाडा च-होली बुद्रुक येथे बुधवारी (दि. ८) दुपारी घडली. आरोपी हा फिर्यादीचा लहान भाऊ आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
सुरेश भैय्या लोदी (वय ४५) असे जखमी कामगाराचे नाव आहे. तानाजी अनंदा गाडेकर (वय ६२, रा. थिटेवस्ती, खराडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत अनंदा गाडेकर (वय ५२, रा. च-होली बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.