- सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- तळवडे डिव्हिजन समोरील देहू – आळंदी रस्त्यावर वाहतूक पोलीस नियमनाचे काम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्यांनी कर्तव्यावरील पोलीसाला शिवीगाळ व धक्काबुक्की करून त्यांच्या शर्टला लावलेली नेमप्लेट ओढून खाली पाडली.
तसेच सोबत असलेल्या पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांच्याशी उद्धट वर्तन अरेरावीची भाषा वापरून धमकी दिली. गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास घटना घडली.
सुरज रामदास जायकर, धीरज रामदास जायकर, प्रज्योत रामदास जायकर (तिघे र म्हेत्रे वस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक गणेश वाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.