न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १३ जाने.) :- फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि छावा युवा संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने भोसरी एमआयडीसी परिसरात शनिवार (दि. १२) रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली.
फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. जिजाऊ मा साहेब यांच्या प्रतिमेस महिला करिष्मा नदाफ यांनी पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी फोरमचे पिंपरी-चिंचवडचे उद्योजक श्रीकृष्ण नरहरे, छावा युवा संघटनेचे कार्यकर्ते इस्माईल नदाफ, सचिन धायमुक्ते, सयाजीर साळवे, दुर्गा भोर, जितेंद्र जगताप, गौरव ढेरे व कामगार महिला उपस्थित होत्या.


















