न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १३ जाने.) :- युनिक व्हिजन स्कूलमध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी “शैक्षणिक मार्गदर्शन कक्ष –Education Bureau” ची स्थापना स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली.
या Education Bureau च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सल्ला दिला जाणार आहे. यामध्ये प्री-प्रायमरीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना “बालशिक्षणाचे महत्त्व” पटवून देण्यात येईल. या व्याख्यानात पालक तसेच आजी आजोबा देखील सहभागी होतील. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता “प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व” समजून सांगण्यात येणार आहे. यामध्ये पालकही सहभागी होतील. त्याचप्रमाणे इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्याना “Key of Success यशाची गुरुकिल्ली“, विद्यार्थी गुणवत्ता वाढ व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालक सहभागी होतील.
इयत्ता दहावीतील वियार्थ्यांना गुणवत्ता वाढीबरोबरच पुढील शिक्षणासाठी करिअर मार्गदर्शन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जविषयक माहिती, तसेच राज्य शासन व केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजना, परदेशी शिक्षणाच्या संधी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या Education Bureau मुळे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
युनिक व्हिजन स्कूलच्या या Education Bereau चा शुभारंभ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्वामी विवेकानंद केंद्राच्या प्रमुख अरुणा मराठे, रेखा तरोडे, अस्मिता करमरकर, युनिक व्हिजन स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. रजनी दुवेदी, संस्थेचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, संचालिका अश्विनी चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी इयत्ता १० वीचे विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांना डॉ. अ.ल. देशमुख यांनी इयत्ता १० वीच्या शेवटच्या महिन्यातील अभ्यासाचे वेळापत्रक, नियोजन व आहार याविषयी मार्गदर्शन केले.











